दापोली, गुहागर, राजापूर व रत्नागिरी येथील कांदळवन आणि प्रवाळांचे होणार संवर्धन

जाहिरात-2
ग्रीन क्लायमेट फंडच्या सहाय्याने राज्याच्या 4 किनारी जिल्ह्यातील 11 तालुक्यात राबवला जाणार प्रकल्प

रत्नागिरी । प्रतिनिधी
जिल्ह्यातील दापोली, गुहागर, राजापूर व रत्नागिरी येथील कांदळवन आणि प्रवाळांचे संवर्धन होणार असून नैसर्गिकरित्या येथील किनारपट्टीचे संवर्धन होणार आहे.

मुंबई-राज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करण्याचा व परिसंस्थांवर आधारित उपजिविकेलाही प्रोत्साहन देण्यासाठी ग्रीन क्लायमेट फंडच्या सहाय्याने प्रकल्प राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. हा प्रकल्प राज्यातील 4 किनारी जिल्ह्यातील 11 तालुक्यात राबवला जाणार आहे. सिंधुदुर्ग (देवगड, मालवण, वेंगुर्ला) रत्नागिरी (दापोली, गुहागर, राजापूर व रत्नागिरी), रायगड (श्रीवर्धन व अलिबाग) आणि पालघर (पालघर, डहाणू).

युनायटेड नेशन्स डेव्हल्पमेंट प्रोग्रॅम, ग्रीन क्लायमेट फंड यांच्या आंशिक अर्थ सहाय्यातून महाराष्ट्र, आंध्रप्रदेश व ओडीसा या तीन राज्यात इनहांसिंग क्लायमॅट रेसिलियन्स ऑफ इंडियाज कोस्टल कम्युनिटीज हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

या प्रकल्पाद्वारे कांदळवनांचे पुन: स्थापन व पुन:स्थापित कादंळवनांची 3 वर्ष देखभाल प्रवाळ परिसंस्थांचे पुन: स्थापन व पुन:स्थापित प्रवाळ परिसंस्थांची 3 वर्ष देखभाल, अवनत पाणलोट क्षेत्राचे पुन: स्थापन व पुन:स्थापित पाणलोटांची 3 वर्ष देखभाल

उपजीविका विषयक उपक्रम अंतर्गत कांदळवनातील खेकडेपालन, शिंपले शेती, कालवं शेती, खेकडा उबवणूक केंद्र, शोभिवंत मासेपालन, सी विड फार्मिंग, भातशेतीकरीता SRI (System of Rice Intensification) तंत्र, मासे मूल्यवर्धित उत्पादने, मत्स्य खाद्य उत्पादन घटक, मासे धुरळणी केंद्र, मध उत्पादन होणार आहे.