दुर्घटना टळली, चीनचं निष्क्रिय रॉकेट हिंदी महासागरात कोसळलं

जाहिरात-2

अवकाशात निष्क्रिय झालेलं आणि चीनच्या नियंत्रणाबाहेर गेलेलं रॉकेट लाँग मार्च 5 बी (Chinese rocket 5B) हिंदी महासागरात कोसळलं आहे. तसेच लाँग मार्च 5 बी नं पृथ्वीच्या कक्षात पुन्हा प्रवेश केल्यावर त्याचे बरेच घटक नष्ट झाल्याचं वृत्त रॉयटर्सनं दिलं आहे. मागील वर्षी चीनमधील अंतरिक्ष केंद्रावरून हे रॉकेट प्रक्षेपित करण्यात आलं होतं. अमेरिकन मिलिटरीने (American Military) चीनचं रॉकेट कधी कोसळणार याबाबतचं भाकीत केलं होतं. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, चीनचं हे शक्तीशाली रॉकेट भारताच्या दक्षिणपूर्व भागात श्रीलंका आणि मालदीवच्या आसपास हिंदी महासागरात कोसळलं आहे. अमेरिकनं स्पेस फोर्सनं दिलेल्या माहितीनुसार, चीनचं हे रॉकेट पृथ्वीकडे 8 हजार मैल प्रतितास वेगानं आलं असेल.

चीनने २८ एप्रिलला तियानहे स्पेस स्टेशन (Tianhe Space Station) बनवण्यासाठी सगळ्यात मोठे रॉकेट ५बी अवकाशात सोडले होते. एक मॉड्यूल घेऊन हे रॉकेट स्पेस स्टेशनमध्ये गेले. मॉड्यूलला निर्धारित कक्षेत सोडण्यात आल्यानंतर याला नियंत्रित पद्धतीने जमिनीवर यायचं होतं. पण, चीनच्या स्पेस एजेन्सीचं या रॉकेटवरील नियंत्रण सुटले.

चीनचं एखादं रॉकेट पृथ्वीवर कोसळण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०२०मध्ये दुसऱ्या एका लॉंग मार्च रॉकेटचे अवशेष पश्चिम अफ्रिकन देशातील आयव्हरी कोस्ट येथील गावांमध्ये कोसळलं होतं. यामुळे या ठिकाणी मोठं नुकसानं झालं होतं. पण यामुळे कोणतीही व्यक्ती जखमी किंवा कोणाचाही मृत्यू झाला नव्हता.