हरवलेले पाकीट घरी जावून केले परत, तळवली येथील तरुणांचा प्रामाणिकपणा

पाटपन्हाळे | वार्ताहर : आजच्या जमान्यातही समाजात प्रामाणिकपणा, माणुसकी टिकून आहे याची प्रचिती देणारे उदाहरण पेवे खरेकोंडला पहायला मिळाले. या जगात आजही प्रामाणिकपणा जिवंत आहे. तळवली येथील संजय सावंत आणि अमोल आग्रे यांनी पेवे खरेकोंड गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री. भागोजी सावरटकर यांचे तळवली येथे हरवलेले पाकीट ज्या पाकीटामध्ये महत्वाची कागदपत्रे होती ते पाकीट थेट श्री.सावरटकर यांच्या खरेकोंड येथील घरी जावून त्यांना परत केले आहे.

सध्या माणूस खूपच स्वार्थी बनला आहे. अशातच लॉकडाऊनमध्ये आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. अशावेळी तळवली शिवरी फाटा येथे रस्त्यामध्ये सापडलेले पाकीट व त्या पाकीटामध्ये असलेली सर्व रोख रक्कम आणि कागदपत्र एखाद्याच्या घरी पोच करणे आजच्या काळात अनपेक्षित होते. परंतु या दोन तरुणांनी आजही माणूसकी जिवंत आहे. प्रामाणिकपणा जिवंत आहे हे दाखवून दिले आहे. या दोन तरूणांचे सावरटकर कुटुंबियांनी आभार मानले. तसेच संपूर्ण पेवे, तळवली परिसरातून या दोन तरूणांचे कौतुक केले जात आहे.

जाहिरात4