रत्नागिरी : महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा

जिल्हाधिकारी मिश्रा यांच्या हस्ते झाले मुख्य शासकीय ध्वजारोहण

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन सोहळा रत्नागिरी जिल्हयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य व एकमेव शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जिल्हयात एकाच ठिकाणी असे ध्वजारोहण करण्याचे निर्देश जारी केलेले होते.

आजच्या या ध्वजारोहण सोहळयास आमदार राजन साळवी, पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी ईंदूराणी जाखड, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड तसेच उपजिल्हाधिकारी सुशांत बनसोडे, तहसीलदार शशिकांत जाधव आदिंची उपस्थिती होती.

जाहिरात4