टी जे मरीन कंपनीतील अपघात प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा

रत्नागिरी | प्रतिनिधी
शहरानजीकच्या एमआयडीसीतील टी.जे. मरीन कंपनीत एका कामगाराच्या मृत्यूस तसेच एकाच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कंपनीतील तिघांविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप सोना सनगरे, विक्रांत विभाकर पवार आणि मोहम्मद उमर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत.

गुरुवारी दुपारी कंपनीमधील मच्छी सुकवण्याचा ड्रायर साफ करीत असताना ड्रायर अचानक सुरू झाला आणि २ कामगार त्यामध्ये चिरडले गेले होते. या अपघातात संतोष विश्राम घवाळी ( ३७, रा. पानवल) याचा मृत्यू झाला.व त्याचा दुसरा सहकारी सुमित अनंत पांचाळ ( २५, रा. कुवारबांव) हा गंभीर जखमी झाला होता.

जाहिरात4