कोरोना नियमांचे उल्लंघन, वधू-वरासह ७ जणांवर गुन्हा

संकेश्वर : कोरोना नियमांचे उल्लंघन करून विवाह सोहळ्याला ५० ऐवजी ३०० लोक जमल्यामुळे वधु- वरासह मंगल कार्यालय मालक फकिरीया सौदागर यांच्यासह ७ जणांवर संकेश्वर पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात मिनी लॉकडाऊन असतानाही येथील निडसोशी रोडवरील मिलन मंगल कार्यालयात गायकवाड व दवडते परिवारातर्फे विवाहसोहळा पार पडला.

दरम्यान,या लग्नाला ५० पेक्षा अधिक लोकांची गर्दी झाल्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी घटनास्थळी जावून संबंधितांवर कारवाई केली. मुख्याधिकारी अभिषेक नाईक यांच्या फिर्यादीवरून संकेश्वर पोलीसात गुन्हा नोंद झाला.