गिम्हवणेत मटका-जुगार अड्डयावर धाड

जालगांव | वार्ताहर

दापोली पोलिसांच्या पथकाने गिम्हवणे येथील हॉटेल कोहिनूर हायवेसमोरील एका टपरीजवळ छापा मारुन मटक्याच्या साहित्यासह एक हजार ५४१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

संशयिताविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. संशयित दिलीप पांडुरंग मयेकर (वय ६५) असे संशयिताचे नाव आहे. संशयित दिलीप मयेकर हे गिम्हवणे येथील हॉटेल कोहिनूर हायवेसमोरील टपरीच्या आडोशाला मटका घेत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी केलेल्या कारवाईत मयेकर यांच्याकडे मटक्याची पावती पुस्तके व रोख १ हजार ५४१ रुपये असा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला असून संशयित दिलीप मयेकर यांच्याविरुद्ध गुन्हा केला आहे.

जाहिरात4