पोलीस स्थानक जवळ असतानाही चोरी करण्याचे अजब धाडस; मंगळसूत्र लांबवीले

रत्नागिरी । प्रतिनिधी
शहरातील धनजीनाका येथील कोकण मर्कन्टाईन बँकेजवळ महिलेच्या गळ्यातील सोन्याचे सुमारे 90 हजार रुपयांचे मंगळसूत्र अज्ञाताने हातचलाखीने लांबवले. ही घटना गुरुवारी दुपारी12.45 ते 1 वा.सुमारास घडली आहे.

याबाबत खतीजा निसार जांभारकर (58,रा.सारख मोहल्ला जयगड,रत्नागिरी) यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार,गुरुवारी दुपारी त्या रत्नागिरीत काही कामानिमित्त आल्या होत्या. त्या धनजीनाका येथील परिसरात आल्या असता अज्ञाताने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लांबवले. ही बाब त्यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

जाहिरात4