राज्यस्तरीय कला संमेलनात खानोलकर दशावतार नाट्य मंडळाच्या संगितसाथीचा गौरव

जाहिरात-2

वेंगुर्ले|प्रतिनिधी
राजर्षी शाहु भवन कोल्हापुर नगरीत संपन्न झालेल्या जिव्हाळा कलामंच यवतमाळ आयोजित भव्य राज्यस्तरीय कलासंमेलनात खानोलकर दशावातार संगित साथीचा विशेष गौरव करण्यात आला. महाराष्ट्रात शासनाच्या कामगार कल्याण नाट्य स्पर्धेत तब्बल 7 वेळा प्रथम क्रमांक मिळवणारी आणि रसिका हृदयाचा वेध घेणारी संगित साथ म्हणुन आज हि या संगितसाथीला राज्यभर ओळखले जाते.

आपल्या नाविन्यपुर्ण सादरीकरण आणि प्रसंगानुरु गाणी हे या साथीचे वैशिष्ट्य मानले जाते. या संगित साथी मध्ये हार्मोनियम वादक पप्पु घाडीगावकर ,तर मृंदुगमणी म्हणुन खानोलकर दशावतार मंडळाचे संचालक बाबा मेस्त्री आणि चेतन मेस्त्री आणि झांज वादक म्हणुन विनायक सावंत साथ करतात. संयुक्त नाटकात ही या त्रिकुटाला विशेष पंसती आहे.
त्यानी दिलेले योगदान आणि प्रभावी सातत्यपुर्ण वादन यासाठी त्याना यासंमेलनात लोककला प्राईड पुरस्कार सिने तारका आणि दशावतार विषयाची विशेष आवड असणाऱ्या डाँ,समिरा गुजर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर शिवाजी विद्यापीठाच्या कला समन्वयक डाँ.नगिना माळी,कला अध्यापक संघाचे अध्यक्ष मुरतुले सर राजर्षी शाहु कला भवनचे व्यवस्थापक हरगुडे आदी मान्यवर उपस्थित होते. या राज्यस्तरीय पुरस्कार देवुन गौरव झालेल्या या खानोलकर मंडळाच्या संगितसाथी साठी रसिकांकडून अभिनंदाचा वर्षाव होत आहे.

जाहिरात4