छावा प्रतिष्ठानची किल्ले जयगड येथे स्वच्छता मोहिम

जाहिरात-2

रत्नागिरी । प्रतिनिधी

छावा प्रतिष्ठान रत्नागिरीचे संस्थापक अध्यक्ष सुनिल धावडे यांच्यातर्फे किल्ले जयगड येथे स्वच्छता मोहिमेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. याला या मावळमातीतील शिवभक्तांचा व शंभूभक्तांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

किल्ले जयगड येथे शुक्रवार दि.१९ फेब्रुवारी २०२१ रोजी स्वच्छता मोहिम संपन्न झाली. यावेळी छावा प्रतिष्ठान रत्नागिरी कडून सरपंच सौ.आर्या गडदे, विवेक सुर्वे, बाबूशेठ पाटील, राजा शिवछत्रपती परीवार चे प्रतिनिधी अलंकार मयेकर यांना पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले.

त्यानंतर स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. या मोहिमेला छावा प्रतिष्ठान रत्नागिरी समवेत ३२ मावळ्यांनी सहभाग घेतला होता. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी छावा प्रतिष्ठान चे रत्नागिरी जिल्हा संघटक समीर धावडे, सचिव समीर गोताड, सदस्य राहूल धावडे, विजय धावडे तसेच हिंदू राष्ट्रसेनेचे प्रविण रोडे, प्रथमेश कांबळे यांनी विशेष मेहनत घेतली.

जाहिरात4