लांजा तालुका जेष्ठ नागरिक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा रद्द

जाहिरात-2

लांजा | प्रतिनिधी

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लांजा तालुका जेष्ठ नागरिक संघाची दिनांक 28 फेब्रुवारी रोजी होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा रद्द करण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष दीनानाथ सरपोतदार यांनी दिली.

लांजा तालुका जेष्ठ नागरिक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा 28 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. या बाबतच्या निमंत्रण पत्रिका संबंधित सभासदांना देण्यात आल्या होत्या. मात्र सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल गंभीर यांची भेट घेऊन त्यांना बैठकीबाबत नियोजन करता येईल का याबाबत चर्चा केली. यावेळी पोलीस निरीक्षक अनिल गंभीर यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्याने तुमची 28 रोजी होणारी बैठक तूर्तास स्थगित करा अशा सूचना केल्या.

त्यामुळे त्यांच्या सूचनेनुसार संघटनेची वार्षिक सभा ही रद्द करण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष दीनानाथ सरपोतदार, सचिव वसंत देसाई व कोषाध्यक्ष संजय बुटाला यांनी दिली. संघटनेच्या सर्व सभासदांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात4