लोकमान्य वाचनालय लांजा चे पोस्टकार्ड लेखन स्पर्धेत सौ.प्रमिला पाटील प्रथम

जाहिरात-2

लांजा | प्रतिनिधी

लोकमान्य वाचनालय लांजा या संस्थेच्या वतीने मराठी राज्य भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त घेण्यात आलेल्या लांजा तालुकास्तरीय पोस्टकार्ड लेखन स्पर्धेत सौ.प्रमिला पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

विज्ञानाची प्रगती आणि मानवी मूल्य या विषयावर ही पोस्ट कार्ड लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदरील पोस्ट कार्ड लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून सौ.प्रमिला हरिदासराव पाटील यांनी प्रथम क्रमांक. कुमारी अभिलाषा कुमार गावडे हिने द्वितीय क्रमांक मिळविला आणि सौ सविता सर्जेराव पाटील यांनी तृतीय क्रमांक मिळविला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून न्यू. इंग्लिश स्कूलचे उपमुख्याध्यापक रमाकांत सावंत आणि तळवडे हायस्कूलचे शिक्षक प्रभाकर सनगरे यांनी पाहिले. सदरील पोस्ट कार्ड लेखन स्पर्धेचा बक्षिस वितरण कार्यक्रम रविवार दिनांक 28 फेब्रुवारी 2021 रोजी सायंकाळी 4-30 वाजता लोकमान्य वाचनालय लांजाचे सभागृहमध्ये आयोजित करण्यात आला आहे .

याच दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन निमित्त बालवाचकांसाठी न्यू.इंग्लिश स्कूल लांजा उपमुख्याध्यापक रमाकांत सावंत यांचे विज्ञान कथाकथन कार्यक्रम घेण्यात येणार आहे .तरी सर्व स्पर्धक वाचनालयाचे सभासद वाचक हितचिंतक यांनी रविवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4-30 वाजता होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन लोकमान्य वाचनालय लांजे तर्फे करण्यात आले आहे.

जाहिरात4