कल्पतरू क्वायर औद्योगिक सहकारी संस्थेचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन

जाहिरात-2

पेंडुर येथील क्लस्टरमुळे अनेकांना मिळणार रोजगार

वेंगुर्ले | दाजी नाईक :
देशातील १८ राज्यातील ५० क्लस्टर प्रकल्पाचे एकाच वेळी ऑनलाईन उद्घाटन केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योगमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल सायंकाळी करण्यात आले. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण-पेंडुर येथील कल्पतरू क्वायर औद्योगिक सहकारी संस्थेचा समावेश आहे. या सर्व व्यवसायांशी निगडीत ४२ हजार लोकांना रोजगार मिळणार असून त्यांच्या नव्या जीवनाची आता सुरुवात होणार आहे. देश विकसित करण्यासाठी प्रधान मंत्री नरेंद्र मोदींजींचे आत्मनिर्भर भारत करण्याचे स्वप्न असून त्यासाठी गाव संमृद्ध ,संपन्न व शक्तीशाली होणे गरजेचेे आहे, असे प्रतिपादन श्री. गडकरी यांनी केले.

काल २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते देशातील ५० क्लस्टर प्रकल्पाचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. यामध्ये मालवण पेंडुर येथील कल्पतरू क्वायर औद्योगिक सहकारी संस्थेचा समावेश होता. दरम्यान हा ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रम महिला औद्योगिक सहकारी संस्था कॅम्प वेंगुर्ले येथील सभागृहात संपन्न झाला. यावेळी महिला काथ्या क्वायर क्लस्टरचे चेअरमन तसेच काथ्या प्रकल्पाचे मार्गदर्शक एम के गावडे, महिला काथ्याच्या संचालिका सौ. प्रज्ञा परब, उपप्रादेशिक क्वायर बोर्ड अधिकारी श्री. श्रीनिवासन, श्री. विष्णू, नीलम क्वायर औद्योगिक संस्थेच्या गीता परब, सनराईझ क्वायर औद्योगिक संस्थेच्या श्रुती रेडकर, राखी करंगुटकर, वर्षा मडगावकर, सुरंगी महिला औद्योगिक संस्थेच्या सुजाता देसाई, अश्विनी पाटील यांच्यासहित मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना श्री. गडकरी म्हणाले की, गावात रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने गावातील लोक मोठ मोठ्या शहरात रोजगाराच्या निमित्ताने स्थलांतरित झाले आहेत. यासाठी गावात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून आत्मनिर्भर भारत बनण्यासाठी ५ करोड नोकऱ्या निर्माण करण्याचे ध्येय असल्याची घोषणा श्री. गडकरी यांनी यावेळी केली. तसेच देशाच्या जीडीपी मध्ये ३० टक्के वाटा हा क्लस्टरचा असून याचे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत नेण्याचा उद्देश आहे. तसेच देशाच्या पूर्ण आयातमध्ये ४८ टक्के वाटा एमएसएमई चा असून तो ६० टक्क्यांपर्यंत नेण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सांगितले. तसेच शहरातील व गावातील विकास यामध्ये समन्वय दिसून येत नाही. गावात आवश्यक तेवढ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध नाही. त्यामुळे गावातील लोक रोजगारासाठी मोठ्या शहरात स्थलांतर करत आहेत. त्यासाठी गावात असणाऱ्या कच्यामालाच्या अनुषंगाने त्या त्या गावांमध्ये प्रकल उद्योग उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली. एमएसएमई च्या माध्यमातून जिल्ह्यातील क्लस्टर प्रकल्पांना उभारी मिळत असून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे एमएसएमई चे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व एमएसएमई विभाचे सर्व अधिकार यांचे एम के गावडे यांनी आभार व्यक्त केले.

जाहिरात4