दापोली तालुका कबड्डी पंच शिबीर उत्साहात

क्रीडा पंच शिबिर कार्यक्रमप्रसंगी मार्गदर्शक समीर कालेकर यांचे स्वागत करताना सत्यवान दळवी
जाहिरात-2

पालगड | वार्ताहर
दापोली तालुक्यातील कबड्डी पंचांचे कबड्डी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. ते उत्साहात संपन्न झाले.
शिबीराचे आयोजन हे नवीन व जुने पंच एकत्र येऊन विचार विनिमय करणे हा उद्देश ठेवूनच करण्यात आले होते. त्यासाठी मार्गदर्शक म्हणून समीर कालेकर व ऋषिकेश ढगळे यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. दापोली तालुक्यातील पंचांच्या विविध शंकांचे निराकरण मार्गदर्शकांनी केले.

दापोली तालुक्यातील कबड्डी पंच व मार्गदर्शक या सगळ्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन श्त दळवी यांनी केले. तसेच मागिल वर्षी जिल्ह्य़ास्तरीय कबड्डी पंच परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान दापोली तालुक्यातील कबड्डी पंच संदिप क्षीरसागर यांचे अभिनंदन दापोली तालुक्यातील पंच प्रमुख वृषाल सुर्वे यांनी सर्व पंच पॅनल तर्फे केले. तर पंच प्रमुख वृषाल ( दादू ) सुर्वे यांनी प्रास्ताविक मध्ये पंचांना प्रत्यक्ष मैदानावर येणा-या अडचणींवर मात करण्यासाठी दापोली तालुक्यातील प्रत्येक माझा पंच हा सक्षम असला पाहिजे हाच उद्देश आहे. त्यानंतर मार्गदर्शकांनी खुप छान मार्गदर्शन केले. शेवटी दापोली तालुक्यातील पंच सचिव वैभव बोरकर यांनी उपस्थितांचे आभार मानून शिबिराची सांगता करण्यात आली.

जाहिरात4