अनधिकृत सिलिका वाहतुकीची तीन वाहने पकडली

जाहिरात-2

संतोष राऊळ|कणकवली

कासार्डे, पियाळी, फोंडा परिसरातून मोठ्या प्रमाणात अनधिकृत मायनिंग उत्खनन व वाहतूक होत असल्याच्या तक्रारी होत्या. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने सोमवारी रात्री नाकाबंदी करत अनधिकृत मायनिंगची वाहतूक करणारे दोन ट्रक व एक डंपर ताब्यात घेतले आहेत. यामुळे मायनिंग वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

प्रांताधिकारी वैशाली राजमाने नायब तहसीलदार एस. व्ही. राठोड, मंडळ अधिकारी मंगेश यादव , तलाठी किरण गावडे व महसूल विभागाच्या पथकाने सोमवारी सायंकाळी उशिरा कासार्डे परिसरात ही कारवाई केली. यात अनधिकृत मायनिंग वाहतूक करणारे दोन ट्रक व एक डंपर ताब्यात घेण्यात आला आहे. तीनही वाहने येथील तहसीलदार कार्यालयाजवळ आणण्यात आली असून मंगळवारी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान अनधिकृत सिलीका वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु असून त्याच पद्धतीने उत्खनन नाही सुरू आहे. याबाबत महसूल विभागाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे अशी मागणी सर्वसामान्यांतून होत आहे.

जाहिरात4