कोकण रेल्वेची ओव्हर हेड लाईन उद्यापासून विद्युतभारित

जाहिरात-2

रेल्वे ट्रॅकच्या शेजारी असणाऱ्या गावातील नागरिकांनी काळजी घ्या- कोकण रेल्वे कडून आवाहन

मुंबई :
दिनांक २२/०२/२०२१ पासून सकाळी ९:०० वाजल्यापासून कोकण रेल्वेच्या रत्नागिरी व रोहा या दरम्यान ओव्हरहेड वायर विद्युत भारित करण्यात येणार आहे. तरी रेल्वे ट्रॅकच्या शेजारी असणाऱ्या गावातील नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

मार्गानजीकच्या कोणत्याही ठिकाणी वायर अथवा खांब तसेच कोणत्याही वस्तूला स्पर्श टाळावा.तसेच, लेव्हल क्रॉसिंग गेट पार करताना ट्रॅक वरील तारेला स्पर्श करेल अशी कोणतीही गोष्ट – जसे की बांबू, शिडी, आंब्याचा घळ- तारेच्या आसपास पोहोचणार नाही अशी काळजी पूर्वक न्यावी अस आवाहन कोकण रेल्वे ने केले आहे.

रोहा ते रत्नागिरी मार्गावर ही विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे तरी रेल्वे मार्गानजीकच्या नागरिकांनी सतर्क रहावे कारण अशा तारा ना स्पर्श करणे प्राणघातक ठरू शकते.त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन कोकण रेल्वेतर्फे करण्यात आले आहे..

जाहिरात4