पावस-भाटीवाडी येथे पॉलिश करण्याच्या बहाण्याने दोघांनी चांदीची साखळी लांबवली

जाहिरात-2

रत्नागिरी । प्रतिनिधी
तालुक्यातील पावस-भाटीवाडी येथे भांडी आणि दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने आलेल्या दोघांनी चांदीची 500 रुपये किंमतीची साखळी लांबवली. फसवणूकीची ही घटना सोमवार 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वा.सुमारास घडली.

सचिन धोंडू किर (40, रा.पावस भाटीवाडी, रत्नागिरी) यांनी याबाबत पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार,सोमवारी सकाळी दोन संशयित त्यांच्या घरी कपडे पावडर विक्री आणि पितळी भांडी पॉलिश करण्याच्या बहाण्याने आले होते.तेव्हा किर यांनी आपल्या घरातील पितळी तांब्या,पितळी मुर्ती आणि कमरेतील चांदीची साखळी त्या दोघांकडे पॉलिश करण्यासाठी दिल्या.काही वेळाने संशयितांनी तांब्या आणि मुर्ती पॉलिश करुन दिल्या परंतू चांदीची साखळी न देताच पळ काढला.ते चांदीची साखळी न देताच पळाल्याचे लक्षात येताच किर यांनी तातडीने पूर्णगड पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.

जाहिरात4