चोरट्यांचा उच्छाद ! एमआयडीसी येथील दुकानाचे शटर उचकटून अज्ञाताने 2 हजार रुपये लांबवले

जाहिरात-2

रत्नागिरी । प्रतिनिधी
शहरानजीकच्या एमआयडीसी येथील दुकानाचे शटर उचकटून अज्ञाताने रोख 2 हजार रुपये लांबवले.याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना रविवार 21 फेबु्रवारी रोजी रात्री 9 ते सोमवार 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वा.कालावधीत घडली आहे.

अशोक कुमार नरसिंग परिहार (32,रा.कारवांचीवाडी,रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली आहे.त्यानुसार,परिहार यांचे जे.के.फाईल्स कंपनीजवळ गजानन अल्युमिनियम अँड ग्लासचे नाव आहे.अज्ञाताने त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून काउंटरच्या ड्रॉवरमधील रोख 2 हजार रुपये चोरुन नेले.सोमवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी गेले असता त्यांना दुकानाचे शटर उचकटलेल्या अवस्थेत दिसून आले.म्हणून त्यांनी दुकानात जाउन पाहिले असता त्यांना दुकानात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.

जाहिरात4