रेल्वे प्रवासात मोबाइल चोरला; दीड महिन्यांनी तक्रार 

जाहिरात-2

रत्नागिरी । प्रतिनिधी
रेल्वेप्रवासादरम्यान तरुणाचा मोबाईल लांबवल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मोबाईल चोरीची ही घटना 11 जानेवारी ते 12 जानेवारी 2021 या कालावधीत कोकणकन्या एक्सप्रेसमध्ये माणगाव रेल्वेस्टेशन ते रत्नागिरी रेल्वेस्टेशन दरम्यान घडली.याबाबत सोमवार 22 फेब्रुवारी रोजी ग्रामीण पोलिसांकडे गुन्हा दाखाल करण्यात आला आहे.

हर्षद अशोक बोभाटे (32,रा.डोंबिवली पश्‍चिम,ठाणे) यांनी याबाबत तक्रार दिली आहे.त्यानुसार, 11 जानेवारी रोजी ते कोकणकन्या एक्सप्रेसने प्रवास करत असताना अज्ञाताने माणगाव रेल्वेस्टेशन ते रत्नागिरी रेल्वेस्टेशन दरम्यान त्यांच्या बॅगमधील 34 हजार रुपयांचा मोबाईल लांबवला.याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.

जाहिरात4