मडूरेत २७ फेब्रुवारी रोजी भाजपा आयोजित खुली रस्सीखेच स्पर्धा

जाहिरात-2

बांदा|प्रतिनिधी :

भारतीय जनता पार्टीच्या वतीने शनिवार २७ फेब्रुवारी रोजी मडूरे परबवाडी येथील मैदानावर भव्य खुली रस्सीखेच स्पर्धा ‘माऊली चषक २०२१’ आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे उद्घाटन सायंकाळी ५ वाजता युवा उद्योजक दत्ता कवठणकर यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी स्पर्धा संयोजक सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब, सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत, सावंतवाडी सभापती सौ. मानसी धुरी, जि. प. सदस्या सौ. शर्वाणी गावकर, पं. स. सदस्या सौ. श्रृतीका बागकर, बांदा मंडळ भाजप तालुकाध्यक्ष महेश धुरी आदी उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १५,०२१ रुपये व चषक, द्वितीय १०,०२१ रुपये व चषक तसेच उपांत्य सामन्यातील पराभूत संघांना प्रत्येकी १००१ हजार रुपये आहे. तसेच उत्कृष्ट फ्रंट मॅन व लास्ट मॅन यांना प्रत्येकी १००१ रुपये व चषक देण्यात येणार आहेत. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी स्पर्धा सहसंयोजक बाळू गावडे (९४०३८८१८२५) व केशव परब (९४०५२२०८२४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

जाहिरात4