धोका वाढला ! खेड तालुक्याची कोरोना बाधितांची संख्या ८४ वर

जाहिरात-2

खेड । प्रतिनिधी

खेड तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने शतकाकडे वाटचाल केली असून १० नव्या रुग्णांची भर पडल्याने रुग्ण संख्या ८४ वर जाऊन पोहचली असल्याने आता आणखी चिंता वाढू लागली आहे. वाढलेल्या रुग्ण संख्येमुळे तालुक्यातील एकूण बाधीतांची संख्या १ हजार ५५७ इतकी झाली आहे त्या पैकी ७६ जण ऍक्टिव्ह असल्याचे येथील आरोग्य विभागाने सांगितले.

सातत्याने वाढत जाणाऱ्या रुग्ण संख्येने प्रशासना समोर आता नवीन आव्हान च उभे राहिले आहे. आंबवली वरवली गावची रुग्ण संख्या देखील वाढतीच आहे. शिवाय या परिसरातील अनेक गावांमध्ये कोरोना चे रुग्ण आढळुन येत आहेत यामुळे आणखी चिंता वाढली आहे.

दरम्यान, न. प. कोव्हिड रुग्णालय १८, कळबणी उपजिल्हा रुग्णालय २६, गृह विलगीकरणं १५, सिव्हिल रुग्णालय २, कामथे १२, तर दापोली ३ असे ७६ ऍक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

जाहिरात4