खेडमध्ये ‘विनामास्क’ फिरणाऱ्या १६ जणांवर दंडात्मक कारवाईचा बडगा !

जाहिरात-2
‘प्रहार डिजिटल’ च्या वृत्ताची प्रशासनाकडून दखल

खेड । प्रतिनिधी

खेड तालुक्यात कोरोना चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना विना मास्क फिरणारे मात्र उदंड झाले होते शासनाचे नियम मोडणाऱ्या विना मास्क धारक फिरणाऱ्या नागरिकांबाबत ‘प्रहार’ ने आवाज उठवताच सोमवारी शहरात तब्बल १६ जणांवर प्रत्येकी ५०० रुपया प्रमाणें ८ हजार रुपयांच्या कारवाई चा बडगा उगारण्यात आला.

खेड शहरात कोरोना बाधितांची संख्या नगण्य आहे. मात्र ग्रामीण भागात कोरोना चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे तालुक्यातील रुग्ण संख्या ८५ इतकी झालेली असताना नागरिक मात्र खुले आम शासकीय नियम पायदळी तुडवत असल्याने नगर परिषद हद्दी मधील शिवाजी महाराज चौक ते तीन बत्ती नाका या परिसरात मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक महेंद्र शिरगाव कर , सुरज चव्हाण, सुतार, दिलीप पवार, परशुराम पाथरे आदी कर्मचारी वर्गाने थेट कारवाई केली यामध्ये एक व्यापारी प्लॅस्टिक पिशवी विक्री प्रकरणी ५ हजार रुपयांचा दंडाची आकारणी केली.

दरम्यान, विना मास्क फिरणाऱ्या बाबत दर दिवशी कारवाई चा बडगा उगारण्याची मोहीम तीव्र केली जाणार असल्याने नागरिकांनी मास्क , सुरक्षित अंतर, सॅनिटर या त्रि सूत्राचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात4