जानवली पुलानजीक हायवेलगत उभ्या असलेल्या चारचाकीला आयशर टेंपोची धडक….

जाहिरात-2

कणकवलीत सलग तिसरा अपघात

संतोष राऊळ(कणकवली)
जाणवलीपुला नजिक हायवेलगत उभ्या असलेल्या व्हॅगनोर या चारचाकीला भरधाव वेगाने मुंबईच्या दिशेने जात असलेला आयशर टेंपोने जोरदार धडक दिली. तर या अपघातात दोन्ही गाड्याने मोठे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली.

दरम्यान अपघाताची माहीती अशी, जाणवलीपुला नजिक हायवेलगत संबंधित व्हॅगनोर चालक तेथिलच कोचिंग क्लास मधील आपल्या मुलांना आणण्यासाठी चारचाकी उभी करूण गेला असता मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव आयशर टेंपोने त्या चारचाकीला मागून जोरदार धडक दिली. अन अपघाताची तीव्रता एव्हडी मोठी होती त्यात चारचाकी आडवी झाली. हा अपघात हॉटेल बावर्ची समोर आज संध्याकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडला. यावेळी दोन्ही अपघातग्रस्त गाड्या कणकवली शहरातील असल्याची चर्चा असून आपसात तडजोड करण्याची शक्यता असल्याने उशिरा पर्यंत अपघताची नोंद कणकवली पोलीसात न्हवती! तसेच काल ( रविवारी ) झालेल्या आयशर टेंपो अपघात ठिकाणच्या विरुद्ध दिशेला आजचा अपघात झाला असून मुंबई गोवा महामार्गाचे चौपदारी करणाचे काम सुरू झाल्यापासून येथे वारंवार या ना त्या अपघातांच्या घटना घडत आहेत.

जाहिरात4