कट्टा येथील स्पर्धेत ध्रुवी भाट, सानिका चव्हाण प्रथम

जाहिरात-2

बॅ. नाथ पै सेवांगण मालवण व कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

मसुरे | झुंजार पेडणेकर

बॅ. नाथ पै सेवांगण मालवण व कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बॅ. नाथ पै सेवांगण मालवणचे कार्याध्यक्ष श्री. दीपक भोगटे म्हणाले, आज राजेशाही बंद होवून लोकशाही राज्यपद्धत आपण स्विकारली आहे. मात्र लोकशाहीतही शिवराज्याचे गुणगान गायले जाते. सर्व जाती-धर्माच्या लोकांना शिवाजी राजे आपले वाटत होते
कार्यक्रमाच्या सुरुवात शिवप्रतिमेस पुष्पहार घालून व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी बापू तळवडेकर, अरविंद शंकरदास, दीपक भोगटे, जयंद्रथ परब, बाळकृष्ण नांदोसकर, गुरुनाथ ताम्हणकर, विश्वनाथ भोगले, सुजाता पावसकर, श्रीधर गोंधळी, संजय जाधव, शिवण वर्गाच्या महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. स्टीच इन टाईम या शिवण वर्गाच्या महिलांनी ‘शिवाजीचा पाळणा’ आणि ‘शिवस्फूर्तीगीत’ सादर करुन शिवरायांना वंदन केले. भक्ती पाटील हिने ‘रायगडला जेव्हा जाग येते’ यातील नाट्यिकरण सादर केले. सानिका चव्हाण हिने सावित्री व शिवाजी यांच्यातील प्रसंगाचे नाट्यीकरण केले. ध्रुवी भाट हिने ‘रायगड किल्ला बोलतोय’ व यशश्री ताम्हणकर हिने ‘प्रतापगड किल्ला बोलतोय’ या विषयावर आत्मकथन सादर केले.
श्री. जयंद्रथ परब यांनी शिवरायाचे संस्कारक्षम प्रसंग कथन केले. तसेच कथनशैलीबाबत विद्यार्थांना मार्गदर्शन केले.
शिवजयंतीनिमित्त “मी शिवरायांचा गड बोलतोय” आणि “शिवरायांचे आठवावे नाट्यरुप” या विषयांवर दोन गटांत वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे –
मी शिवरायांचा गड बोलतोय गट चौथी ते सातवी
प्रथम क्रमांक – ध्रुवी महेश भाट – वराडकर हायस्कूल कट्टा
द्वितीय क्रमांक – यशश्री गुरुनाथ ताम्हणकर (मसुरे नं.१), रिया हनुमंत गावडे (चौके हाय.), गौरेश विश्वनाथ भोगले (माळगाव हाय.), देवदत्त धनंजय गावडे (वराडकर हाय.), सूरज संतोष मसुरकर (मसुरे नं.1), सृष्टी संजय पाताडे (कुणकवळे)
तृतीय क्रमांक – वैष्णवी दत्ताराम सावंत (मसुरे नं.1), मयुरी दिगंबर कदम (कुणकवळे), रिदीमा रोशन दळवी (कुणकवळे), पियुष संजय भोगले(मसुरे नं.1), चैतन्य भगवान भोगले (मसुरे नं.1)
चतुर्थ क्रमांक – प्रतिक्षा भरत पवार (कुणकवळे), ओंकार सागर रोहिलकर (कट्टा नं.1), श्रेया प्रदीप मगर (मसुरे नं.1)
उत्तेजनार्थ – यामिनी नित्यानंद म्हाडगुत (कट्टा नं.1), दर्पणा लवू वाईरकर (कट्टा नं.1)
शिवरायांचे आठवावे नाट्यरुप– गट आठवी ते बारावी*
प्रथम क्रमांक – सानिका सतिष चव्हाण – पणदूर हायस्कूल
द्वितीय क्रमांक – भक्ती विश्वजित पाटील (पेंडूर हायस्कूल), वैशाली विष्णू परब (काळसे हाय.)
तृतीय क्रमांक – अभिषेक अनिल मेस्त्री (मसुरे नं.1)
विशेष पुरस्कार – सौ. स्वाती पोखरणकर , सौ. प्रियांका लवू वाईरकर.
या स्पर्धेचे परिक्षण सौ.सुजाता पावसकर व श्री. दीपक भोगटे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. बाळकृष्ण नांदोसकर यांनी केले.

जाहिरात4