शेर्लेत काजू बागायतीसह आगीत गवताच्या गंज्या खाक

जाहिरात-2

 

सुमारे ३५ हजार रुपयांचे नुकसान ; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा शेतकर्‍यांचा आरोप

बांदा | प्रविण परब

शेर्ले सावरी जवळील परिसरात आज दुपारी काजू बागायतीस आग लागल्याची दुर्घटना घडली. काजूसह गवताच्या गंजीला आग लागून सुमारे ३५ हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज शेतकर्‍यांनी व्यक्त केला. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.

शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान अचानक लागलेल्या आगीमुळे बागेत काम करत असलेल्या महिला घाबरल्या. त्यांनी आगीची खबर स्थानिकांना दिली. दुपारची वेळ असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत अरुण बाबलो राऊळ, शशिकांत बाबलो राऊळ व देवानंद गोपाळ राऊळ यांच्या बागेतील काजू कलमे, नारळाची रोपे व दोन गवताच्या गंज्या जळून खाक झाल्या. याबाबत राऊळ यांनी तात्काळ बांदा येथील वीज कार्यालयाला फोनवर माहिती दिली. बांदा कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता सुभाष आपटेकर घटनास्थळी दाखल झाले. एकंदरीत घटनेची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्याकडून पंचनामा करून आपल्या कार्यालयाला द्या. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी शेर्ले सरपंच जगन्नाथ धुरी, पोलिसपाटील विश्राम जाधव, वायरमन नाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात4