पालीत सापडले 2 कोरोना पॉझिटिव्ह; ग्राम कृतीदालाने घेतले महत्वाचे निर्णय

रत्नागिरी । प्रतिनिधी
रत्नागिरी तालुक्यातील पाली गावामध्ये कोरोना ( कोव्हीड १९ ) चे २ बाधित रुग्ण आढळून आल्याने ग्रामकृतीदल समिती ग्रामपंचायत पालीने महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

दिनांक – १८/०२/२०२१ च्या ग्रामपंचायत ग्रामकृतीदलाच्या सभेत प्रतिबंधात्मक निर्णय व उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आले आहे. त्यामध्ये पाली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व शाळा, अंगणवाडी, हायस्कूल, कॉलेज व आय.टी.आय स्कूल व प्रायव्हेट क्लासेस हे दिनांक – २०/०२/२०२१ ते २७/०२/२०२१ पर्यंत बंद ठेवणे, पालीचा बुधवार आठवडा बाजार हा पुढील २ आठवडे पूर्णपणे बंद करणे, पालीतीलबाजारपेठेतील दुकाने हि पुढील २ बुधवार पूर्णपणे बंद ठेवणे, पाली कार्यक्षेत्रात बिना मास्क आढळल्यास रुपये १०० / – दंड आकारण्यात येईल, पाली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व दुकान व्यावसायिक यांनी दुकानात सोशल डीस्टन्स व सॅनिटायझर चा वापर करावा तसेच बिना मास्क असणाऱ्या व्यक्तीस वस्तू देऊ नयेत असेही ग्रामकृतीदालाने स्पष्ट केलं आहे.

जाहिरात4