Realme Narzo 30 Pro झाला लिस्ट, Narzo 30 सोबत लवकरच होईल लाॅन्च

जाहिरात-2

Realme संबंधित माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती ज्यात समजले होते कि हि टेक कंपनी आपल्या ‘नारजो’ सीरीजच्या विस्ताराची योजना बनवत आहे त्याअंतर्गत Realme Narzo 30 लाॅन्च केला जाईल. रियलमी कम्यूनिटी वेबसाइटवर रियलमी नारजो 30 च्या रिटेल बाॅक्सचे फोटोज पण शेयर करण्यात आले होते. आता अजून एक मोठी बातमी समोर येत आहे त्यानुसार या सीरीजचा Realme Narzo 30 Pro स्मार्टफोन सर्टिफिकेशन्स साइट टेनावर लिस्ट केला गेला आहे.

Realme Narzo 30 Pro चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेनावर स्पाॅट केला गेला आहे. चायनीज वेबसाइटच्या हवाल्याने जीएसएम एरिनाने बातमी दिली आहे त्यावरून समजले आहे कि रियलमी नारजो 30 प्रो टेनावर RMX3161 मॉडेल नंबरसह लिस्ट केला गेला आहे. या लिस्टिंग मध्ये फोनचा फोटो समोर आल्यामुळे नारजो 30 प्रो च्या लुक आणि डिजाईनची माहिती मिळाली आहे तसेच हा या फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

असा असेल लुक

टेनावर समोर आलेल्या फोटोज मध्ये कथित रियलमी नारजो 30 प्रो पंच-होल डिस्प्ले डिजाईनवर बनलेला दाखवण्यात आला आहे. सेल्फी कॅमेरा असलेला हा पंच-होल स्क्रीनच्या वर डावीकडे देण्यात आला आहे. फोटो मध्ये डिस्प्लेच्या चारही कडा नॅरो बेजल्ससह दिसत आहेत. तसेच फोनच्या बॅक पॅनलवर क्वाॅड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर डावीकडे बनलेल्या चौकोनी आकारात आहे. फोनच्या डाव्या पॅनलवर वाल्यूम राॅकर देण्यात आहे तर उजव्या पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड पावर बटन आहे.

असे असतील स्पेसिफिकेशन्स

Realme Narzo 30 Pro म्हणजे RMX3161 टेनानुसार 6.5 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेवर लाॅन्च केला जाईल. या सर्टिफिकेशन्स साइटवर फोनचे डायमेंशन 162.5 x 74.8 x 8.8एमएम असल्याचे सांगण्यात आले आहे. रियलमीचा हा आगामी स्मार्टफोन अँड्रॉइड 11 सह वेबसाइटवर लिस्ट झाला आहे ज्या अंतर्गत फोन मध्ये रियलमी युआय देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 4,880एमएएचची बॅटरी असल्याचे सांगण्यात आले आहे. Realme Narzo 30 Pro मध्ये प्रोसेसर कोणता दिला जाईल, याची माहिती समजली नाही पण सर्टिफिकेशन्स मध्ये स्पष्ट सांगण्यात आले आहे कि रियलमीचा हा फोन एक 5G स्मार्टफोन असेल.

Realme Narzo 30

अलीकडेच रियलमी कम्यूनिटी वेबसाइटवर रियलमी नारजो 30 फोनच्या 6 रिटेल बॉक्सचे फोटोज शेयर केले गेले होते. हि पोस्ट शेयर करून फॅन्सकडून अभिप्राय मागवण्यात आला होता कि यातील कोणता बाॅक्स त्यांना सर्वात चांगला वाटला आहे. म्हणजे यातील तो बॉक्स फाइनल होईल आणि बाजारात येईल. विशेष म्हणजे रियलमी एक्स7 सीरीजच्या लॉन्चच्या आधी पण कंपनीने अश्याच रिटेल बॉक्सेजचा फोटो शेयर करून फॅन्सकडे अभिप्राय मागितला होता. आता नारजो 30 सीरीजच्या लॉन्च बद्दल कंपनीच्या घोषणेची वाट बघितली जात आहे.

जाहिरात4