घराची बनावट कागदपत्रे करून देवरुखातील एकाला ११ जणांनी फसवले

देवरूख । प्रतिनिधी
घराची बनावट कागदपत्रे बनवून देवरूख कांजिवरा येथील नागरिकाची ११ जणांनी फसवणुक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. देवरूख पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार सलीम जेठी यांनी फिर्याद दिली आहे. सलीम जेठी यांच्या मालकीचे (घर क्रमांक ४/३४४) कांजिवरा येथे घर आहे. ३ जून २००५ ते २६ फेब्रुवारी २०२० या कालावधीत जुमालाल युनुस जेठी, ईस्माईल जेठी, अश्रफ जेठी, रेश्मा कावणकर, समीर जेठी, जमीर जेठी, गणि जेठी, बानीबी गडकरी व तत्कालीन ग्रामविकास अधिकारी आदींनी बनावट कागदपत्रे तयार करून आपली फसवणुक केल्याचे व मारण्याची धमकी दिल्याचे सलीम जेठी यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

सलीम जेठी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ११ जणांविरोधात देवरूख पोलीस ठाण्यात भा. द. वि. कलम ५०६ (२), ४६७, ४६८, ३२४, ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास हेड काँन्सटेबल डी. एस. पवार करीत आहेत.

जाहिरात4