वागदे येथे अपघात :टेम्पोला दुचाकीस्वाराने दिली धडक

कणकवली  | प्रतिनिधी 
वागदे ग्रामपंचायत समोरील हायवेलगत उभ्या असलेला टाटा छोटा हत्ती टेम्पोला कणकवलीकडून ओसरगावकडे जात असलेल्या दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराच्या डोक्याला तर मागे बसलेल्या युवकांच्या पायाला दुखापत झाली आहे. हा अपघात दुपारी 3.30 वा.सुमारास घडला.

अपघात घडला त्यावेळी साकेडीमधील रिक्षा चालक किरण वर्दम या ठिकाणाहून जात होते. त्यांनी व ग्रामपंचायत शेजारीच असलेल्या दुकानातील कामगार मोहम्मद शेख यांनी तात्काळ जखमींना रिक्षेतुन उपजिल्हारुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

सदर अपघाताची माहिती नागरिकांनी पोलीस स्टेशनला दिली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. यावेळी उपस्थित वागदे स्थानिक ग्रामस्थांनी मदत केली.

जाहिरात4