भाजपचा विजय हा गावागावात केलेल्या विकास कामांची पोचपावती – आ. नितेश राणे.

सेनेचे पालकमंत्री, खासदार, पडलेले सडलेले फिरत होते गावोगावी, तरीही झाला दारुण पराभव.

वैभववाडीत विजयी उमेदवारांचा नितेश राणे यांनी केला सत्कार.

वैभववाडी । नरेंद्र कोलते
वैभववाडी तालुक्यात ग्रा.पं. निवडणुकीत मिळालेले यश हे भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळेच. मी कुठेही प्रचारात नसताना कार्यकर्त्यांनी 9 ग्रा.पं. वर विजय मिळविला आहे. विरोधकांचे पालकमंत्री, खासदार, पडलेले सडलेले सगळे उतरले असताना त्यांच्या हाती यश लागू शकले नाही. हा त्यांचा नैतिक पराभव आहे. भाजपचा विजय हा गावागावात केलेल्या विकास कामांची पोचपावती आहे. अशी प्रतिक्रिया आ. नितेश राणे यांनी व्यक्त केली.

वैभववाडीत ग्रा.पं. निवडणुकीत विजय मिळविलेल्या भाजपा उमेदवारांचे आ. नितेश राणे यांनी अभिनंदन केले. एकुण 13 पैकी 9 ग्रा.पं वर भाजपने विजय मिळविला आहे. नितेश राणे यांचे वैभववाडीत आगमन होताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, सभापती अक्षता डाफळे, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, भालचंद्र साठे, दिलीप रावराणे, बंड्या मांजरेकर, हुसेन लांजेकर, किशोर दळवी, पं.स. सदस्या हर्षदा हरयाण, बाबा कोकाटे आदी उपस्थित होते. आमदार नितेश राणे म्हणाले, भाजपच्या विजयाची घोडदौड अशीच पुढे चालू राहणार आहे. नगरपंचायत निवडणूकीतही भाजपाच विजयी होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ज्या ठिकाणी कमी पडलो त्याचे आत्मचिंतन आम्ही निश्चित करू. या निवडणुकीत विजयासाठी दिवस-रात्र मेहनत घेणारे भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार यांचे त्यांनी अभिनंदन केले. निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे त्यांनी अभिनंदन केले.

जाहिरात4