सावंतवाडीत कोरोना प्रतिबंधक लसिकरणाचा शुभारंभ

वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग वजराटकर यांना पहिला डोस
सावंतवाडी : प्रतिनिधी

दीर्घ प्रतीक्षेनंतर कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा सुदिन येऊन ठेपला. संपूर्ण देशात व राज्यात या लसिकरणाचा शुभारंभ झालेला असतानाच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातही कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कोरोनाची पहीली लस रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग वजराटकर यांना देण्यात आली. पारीचारीका शुभांगी देऊलकर यांच्या हस्ते हा डोस देण्यात आला. तर कर्मचाऱ्यांमधून परिचारीका आरेकर यांनी पहीला डोस घेतला.‌
यावेळी जि.प. अध्यक्षा समिधा नाईक, मुख्याधिकारी हेमंत वसेकर, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, पोलिस निरीक्षक शशिकांत खोत, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर, गटविकास अधिकारी व्ही. एम.नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

सावंतवाडीत १०० लाभार्थ्यांना प्राथामिक टप्प्यात ही लस देण्यात येणार आहे. या लसीकरणासाठी संपुर्ण टीम सज्ज झाली आहे अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम पाटील यांनी दिली.यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. अभिजित चितारी, डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांसह उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर, परिचारिका आदी उपस्थित होते.

जाहिरात4