कणकवलीत कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू

स्थानिक आमदार नितेश राणे यांनी दीपप्रज्वलनाने केला शुभारंभ
कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १००कर्मचाऱ्यांना दिला जातोय डोस

संतोष राऊळ | कणकवली  कणकवली उपजिल्हा रुग्णालयात कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला सुरवात झाली.स्थानिक आमदार नितेश राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि श्रीफळ वाढवून या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी तहसीलदार आर.जे.पवार,उपजिल्हा रुग्णायाचे प्रभारीअधीक्षक डॉ.सतीश टाक,पंचायत समिती सभापती मनोज रावराणे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत, ,कणकवली नगरपंचायत उपनगराध्यक्ष बंडू हर्णे,गटविकास अधिकारी अरुण चव्हाण,पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री,भाजपा तालुका अध्यक्ष संतोष कानडे,नगरसेवक शिशिर परुळेकर व वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.
या वेळी उपजिल्हा रुग्णालयाच्या केंद्रावर शंभर कर्मचाऱ्यांना ही लास देण्यात येणार आहे.त्यांना २८दिवसांनी याच लोकांना पुन्हा या लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे.

जाहिरात4