हद्दपार आरोपी हद्द ओलांडताच पोलिसांच्या जाळ्यात !

खेड । प्रतिनिधी
रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातून हद्दपार केलेला आरोपी पुन्हा आपल्या घरी वास्तव्यास आल्याप्रकरणी त्याच्याविरोधात खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जहीर इब्राहीम कादीरी (49,रा.नांदगाव मोहल्ला खेड,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात खेड पोलिस ठाण्याचे पोलिस हेड काँस्टेबल कृष्णा सदाशिव बांगर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, खेड पोलिस ठाण्यातून हद्दपार रजिस्टर नं.2/18 मधील हद्दपार आरोपी जहिर कादीरी याला रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातून 15 मार्च 2019 पासून दोन वर्षांकरता हद्दपार करण्यात आले होते. परंतू हद्दपारीचा कालावधी पूर्ण होण्याअगोदरच तो नांदगाव येथील आपाल्या घरी वास्तव्याला आला होता. ही माहिती खेड पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने कारवाई करत जहीर कादीरीवर रविवारी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास पोलिस हेड काँस्टेबल बाणे करत आहेत.

जाहिरात4