पावस येथे घेतलेली माझे कुटुंब माझी जबाबदारी महाविद्यालयीन ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

रत्नागिरी । प्रतिनिधी

पावस एजुकेशन सोसायटी संचालित मुराद उमर मुकादम जुनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स अँड राबिया शेख अहमद नाखवा जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स, पावस आयोजित माझे कुटुंब माझी जबाबदारी ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा नुकतीच पार पडली. कोरोनाच्या महामारीमध्ये आपली आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षा कशी करावी आणि कोणकोणती खबरदारी घ्यावी यासारखी महत्वपूर्ण माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हि स्पर्धा घेण्यात आली.

यामध्ये विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. स्पर्धेमधील विजेते पुढील प्रमाणे : प्रथम क्रमांक – कु. अरफा अतिक फोडूं, द्वितीय क्रमांक : कु. फरजान अख्तर वाडकर, तृतीय क्रमांक :- कु.मोहम्मद कैफ तस्लीम बोरकर, उत्तेजनार्थ :- कु.आफा काझी,कु.फरहीन मुकादम.
याप्रसंगी संस्थेचे चेयरमेन जावेद शेठ काझी, अध्यक्ष लाईक शेठ फोडूं , सचिव मुदस्सर शेठ मुकादम, उपसचिव मन्सूर शेठ काझी, खजिनदार :- शफी शेठ काझी, मुख्याध्यापिका सौ. साजिदा बिजापूरे, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कॉलेजचे सुपरव्हायजर तौफिक शेख, सब्रीना नाखवा, सुमैय्या जमादार, वासिम फलटनवाले, तबस्सुम मुल्ला, शाहीन शेख यांनी मेहनत घेतली.

जाहिरात4