झोळंबे भजन स्पर्धेत मेणकुरे गोव्याचा महिला भजनी संघ प्रथम

जाहिरात-2

स्पर्धेत १४ संघ सहभागी : स्पर्धेत महिला भजनी कलाकारांचा वरचष्मा

बांदा | प्रविण परब

झोळंबे भजनप्रेमी व ग्रामस्थ आयोजित खुल्या भजन स्पर्धेत गोव्यातील मेणकुरे येथील श्री देवी माऊली कला क्रीडा व सांस्कृतिक महिला भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. कोलवाळ येथील ओंकार महिला भजन मंडळ द्वितीय तर सांगेली येथील श्री सनमदेव प्रासादिक भजन मंडळ तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व विजेत्या भजनी मंडळांना रोख पारितोषिके व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

झोळंबे भजनप्रेमी व ग्रामस्थ यांच्यावतीने खुली भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे हे ४ थे वर्ष होते. स्पर्धेचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक प्रकाश गवस यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी गणेशप्रसाद गवस, सरपंच राजेश गवस, सामाजिक कार्यकर्ते सतीश कामत, गावचे मानकरी, विविध संस्था व मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. स्पर्धेत जिल्ह्यासह गोव्यातील एकूण १४ संघ सहभागी झाले होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे – प्रथम श्री देवी माऊली कला क्रीडा व सांस्कृतिक महिला मंडळ मेणकुरे (गोवा), द्वितीय ओंकार महिला भजन मंडळ कोलवाळ (गोवा), तृतीय श्री सनमदेव प्रासादिक भजन मंडळ सांगेली, उत्तेजनार्थ श्री साई सातेरी आजोबा भजन मंडळ सत्तरी (गोवा), शिस्तबद्घ संघ श्री देव काळोबा भजन मंडळ कवठणी, लक्षवेधी संघ शिवप्रसाद सातेरी भजन मंडळ तुये (गोवा), कलासाधना संगीत संस्था हणखणे (गोवा), उत्कृष्ट गायक प्रथम शारदा शेटकर (मेणकुरे), द्वितीय रुपेश गांवस (सत्तरी गोवा), उत्कृष्ट गौळण गायक श्रद्धा जोशी (कोलवाळ), उत्कृष्ट हार्मोनियम वादक आनंद नाईक (कोलवाळ), उत्कृष्ट तबलावादक गितेश कांबळे (मणेरी), उत्कृष्ट पखवाजवादक भावेश राणे (सांगेली), उत्कृष्ट झांजवादक धनंजय दाभोलकर (नेरुर), उत्कृष्ट श्रोता प्रथम दिगंबर गवस, शुभम गवस.

रात्री उशिरा स्पर्धेचे बक्षीस वितरण सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई, राजीव गांधी निराधार योजना दोडामार्ग अध्यक्ष गणेशप्रसाद गवस, झोळंबे सरपंच राजेश गवस, शिवशक्ती मंडळ अध्यक्ष दिलीप घोगळे, तळकट सरपंच एम. डी. धुरी, तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुखाजी गवस, देवस्थान कमिटी अध्यक्ष सुधाकर गवस, ग्रा. पं. सदस्य पांडुरंग गवस, गोवा मित्रमंडळ सल्लागार सदाशिव डेकर, सचिव विठ्ठल गवस व मुंबई मित्रमंडळ सदस्य यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

स्पर्धेचे परीक्षण निलेश मेस्त्री, रोहिदास परब, उल्हास पाळनी यांनी केले. ध्वनिसंकलन सुभाष शिरोडकर, छायाचित्रण ओमप्रसाद गवस, सुत्रसंचलन संदीप गवस, प्रास्ताविक जगदीश गवस यांनी तर आभार संतोष वझे यांनी मानले. स्पर्धेसाठी दशक्रोशीतील भजनप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात4