उसाची मळी घेउन जाणारा टँकर हातखंबा येथे उलटला; दुखापत नाही

जाहिरात-2

रत्नागिरी ।प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथील दर्गास्टॉपजवळ टँकर उलटून अपघात झाला. ही घटना सोमवारी सकाळी 10.15 वा. सुमारास घडली.सुदैवाने यात कोणालाही दुखापत झालेली नसून याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

सोमवारी संत विजय यादव (34,रा.उत्तरप्रदेश) हा आपल्या ताब्यातील टँकर(एमएच-04-ईवाय-2255) मधून उसाची मळी घेउन कोल्हापूर ते जयगड असा येत होता.तो हातखंबा येथील दर्गा स्टॉपजवळ आला असता उतारात टँकरचा ब्रेक न लागल्याने टँकरवरील ताबा सूटून हा अपघात झाला.ब्रेक लागत नसल्याचे लक्षात येताच यादवने टँकरला रस्त्याच्या उजव्या बाजुला नेल्यामुळे तो बाजुलाच असलेल्या छोट्या टेकडीवर आदळून उलटलो.त्यामुळे टँकरमधील उसाची मळी रस्त्याच्याकडेने थोड्या प्रमाणात वाहून गेली.दरम्यान,अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन ग्रामीण पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद केली.

जाहिरात4