रत्नागिरी शहरात बारबाहेर हाणामारी; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

जाहिरात-2

रत्नागिरी । प्रतिनिधी
किरकोळ कारणातून शहरातील गोखले नाका येथील एका बार बाहेर तरुणास हातांच्या ठोशांनी मारहाण करुन गंभिर जखमी केले. मारहाणीची ही घटना रविवारी रात्री 10.30 वा.सुमारास घडली.याप्रकरणी तीन जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुफियान,अण्णा काशा आणि तन्वीर जीवाजी (सर्व रा.मिरकरवाडा,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.त्यांच्याविरोधात मुजफ्फर मजीद फणसोपकर (39,रा.राजीवडा,रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे.त्यानुसार,रविवारी त्यांचा वाढदिवस असल्याने ते मित्रांसोबत गोखले नाका येथील मिनार बारमध्ये सेलिब्रेशन करण्यासाठी गेले होते.त्यावेळी तिथे तीन्ही संशयितही दारु पित होते.

दरम्यान,फणसोपकर आपला वाढदिवस साजरा करत असताना तिघेही त्यांच्या टेवलजवळ येउन नाचत होते.तेव्हा फणसोपकर यांनी त्यांना आमच्या टेबलजवळून निघून जा असे सांगितले.त्यावर सुफियान मोठ-मोठ्याने ओडत व आपल्या साथिदारांना शिवीगाळ करत होता.थोड्या वेळाने अण्णा काशा आणि तन्वीर जीवाजी हे दोघे बार बाहेर निघून गेले.तर सुफियान आणखी मोठ्याने आरडा-ओरडा करु लागला तेव्हा बार मालकाने त्याला बार बाहेर नेले.त्यानंतर काहीवेळाने मुजफ्फर फणसोपकर घरी जाण्यासाठी बार बाहेर पडले.तेव्हा तिन्ही संशयित बार बाहेर त्यांची वाट पहात होते.फणसोपकर बाहेर पडताच तिघांनीही त्यांना शिवीगाळ करत हातांच्या ठोशांनी मारहाण केली. या मारहाणीत फणसोपकर यांच्या मोबाईलचेही नुकसान झाले.अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

जाहिरात4