लांजा : धरणावर काम करणाऱ्या कामगाराने खोरनिनको येथील अल्पवयीन मुलीचे केले अपहरण; गुन्हा दाखल

जाहिरात-2

लांजा । प्रतिनिधी

तालुक्यातील खोरनिनको मुसळेवाडी येथील एका अल्पवयीन मुलीला धरणावर काम करणाऱ्या कामगाराने फुस लावून अपहरण केल्याप्रकरणी वाशिम येथील एका युवकावर लांजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तालुक्यातील खोरनिनको येथील मुचकुंदी नदीवर लघुपाटबंधारे विभागाच्या धरण प्रकल्पाचा आरसीसी कॅनॉल बांधण्याचे काम गेली तीन वर्षे सुरु आहे. हे काम करण्यासाठी वाशिम येथील पंकज तायडे हा येथे कामाला आहे. पंकज हा अपहरण केलेल्या मुलगीच्या काकाकडे जेवण करण्यासाठी नेहमी येत होता. बुधवार दि. १८ नोव्हेंबर रोजी रात्री ९.४५ ते गुरुवारी सकाळी ७ यावेळेत अल्पवयीन मुलगीच्या अज्ञानाचा गैरफायदा उठवत पंकज याने तिला फुस लावून अपहरण केल्याची फिर्याद मुलीचे वडील यांनी लांजा पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार पोलिसांनी पंकज याच्या विरोधात भा .द.वि.कलम ३६३ नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास हेड. कॉन्स्टे. शांताराम पंदेरे हे करीत आहेत.

जाहिरात4