कोकण रेल्वे मार्गावर रुळावर आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह

जाहिरात-2

कणकवली | चंद्रशेखर तांबट 
कणकवली ते नांदगाव रेल्वे स्थानकादरम्यान हुंबरठ बौद्ववाडी येथे रेल्वे रुळावर शनिवारी सकाळी ९ : ३०  च्या सुमारास अज्ञात महिलेचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला ४०  ते ४५  वयोगटातील ती महिला असावी सकाळी साडेनऊच्या सुमारास गेलेल्या दादर – सावंतवाडी ट्रेनखाली आलेल्या त्या महिलेला अपघात झाला कि तिने आत्महत्या केली हेही स्पष्ट झाले नाही.
या महिलेची उंची 5 फूट असावी रंग गोरा असून बर बांधा मजबूत होता केस काळे पांढरे चेहरा गोल आहे पिवळसर व पांढऱ्या रंगाची फुल असलेली साडी गळ्यात काळ्या मण्याचे पांढऱ्या धातूचे मंगळसूत्र होते.
दादर सावंतवाडी ट्रेन च्या मोटर मनने कणकवली स्थानकात अपघाताची कल्पना दिली अपघाताची खबर मिळताच सहाय्य्क पोलीस निरीक्षक सागर खंडागळे पोलीस उपनिरीक्षक अनमोल रावराणे महिला हेड कॉन्स्टेबल ममता जाधव पोलीस कॉन्स्टेबल योगेश राऊळ राहुल तळस्कर यांनी घटनास्थळी धाव घेतली याबाबत रेल्वे पोलीस युवराज पाटील यांनी फिर्याद दिली आहे.

जाहिरात4