सावंतवाडीत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवरील कारवाई सुरुच

जाहिरात-2

शनिवारी ६३ वाहनचालकांवर कारवाई ; एकूण १३ हजारांचा दंड वसूल

सावंतवाडी | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षक राजेद्र दाभाडे अप्पर पोलिस अधीक्षक तुषार पाटिल व जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी शहरात वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांविरोधात मोहिम शनिवारीही कायम ठेवण्यात आली होती. यात दिवसभरात शहरात ६३ वाहन चालकांवर केलेल्या कारवाईत तब्बल १३,८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यात विना लायसन्स वाहतूक, काळ्या काचा, ट्रीपल सीट अशा वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. यापुढेही ही कारवाई अशीच चालू राहणार असल्याचे यावेळी वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले. या मोहिमेत वाहतूक पोलिस दीपक दळवी , आबा पिळणकर, पोलिस हवालदार भोगले आदी सहभागी झाले होते.

जाहिरात4