भरमसाठ आलेल्या वीज बिलांविरोधात मनसे छेडणार जन आक्रोश आंदोलन – सचिन तावडे

जाहिरात-2

वैभववाडी । नरेंद्र कोलते
भरमसाठ आलेली वीज बीले भरण्याबाबत वीज वितरण कडून सक्ती केली जात आहे. या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जन आक्रोश छेडले जाणार आहे. या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे. असे आवाहन वैभववाडी तालुकाध्यक्ष सचिन तावडे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.

कोरोनात लाँकडाऊन सक्तीचे करण्यात आलेल्या अनेकांचे रोजगार बंद पडले. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगने मुश्कील झाले आहे. त्यामुळे लाॕकडाऊन दरम्यान आलेली भरमसाट वीज बीले माफ करावी अशी मागणी राज्यातील जनतेकडून करण्यात येत आहे. माञ वीज वितरण कंपनीकडून वीज बील भरण्याची सक्ती करण्यात येत आहे. या विरोधात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला येत्या सोमवारपर्यंत मुदत दिली आहे. तोपर्यंत वीज बील माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला नाही तर मनसे राज्यव्यापी जन आक्रोश आंदोलन छेणार आहे. या आंदोलनात तालुक्यातील जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन तालुकाध्यक्ष सचिन तावडे यांनी केले आहे.

जाहिरात4