Breaking : कल्याणचे पर्यटक मालगुंड समुद्रात बुडाले; एकाचा मृत्यू दोघे वाचले पर्यटक मालगुंड समुद्रात बुडाले; एकाचा मृत्यू दोघे वाचले पर्यटक मालगुंड समुद्रात बुडाले; एकाचा मृत्यू दोघे वाचले

जाहिरात-2

रत्नागिरी । प्रतिनिधी
तालुक्यातील मालगुंड समुद्रकिनारी फिरण्यासाठी आलेले तीन मुंबईतील पर्यटक शनिवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास बुडाले. त्यातील एकाचा बुडून मृत्यू झाला असून दोघांना वाचवण्यात यश आले आहे.

तुषार शरद दळवी (34, रा. कल्याण – ठाणे ) याचा बुडून मृत्यू झाला. तर शेखर आप्पा राजे (34) आणि अमितेश त्रिपाठी (32, दोन्ही रा. कल्याण – ठाणे ) या दोघांना वाचवण्यात यश आले. दिवाळी सुट्टीनिमित्त हे तिघेही गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी आले होते. शनिवारी सायंकाळी ते मालगुंड समुद्रकिनारी आंघोळकरण्यासाठी गेले होते. तेव्हा पाण्याचा अंदाज न आल्याने ते गटांगळ्या खाऊ लागले.तेव्हा स्थानिक ग्रामस्थांनी मालगुंड पोलिसांना याची खबर दिली. माहिती मिळताच महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल सरगर यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने तिघांनाही पाण्याबाहेर काढले.
तिघांनाही मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तुषारला तपासून मृत घोषित केले.

जाहिरात4