खेड : ६ दिवसांत कोरोनाचे १० नवे रूग्ण !

जाहिरात-2
खेड । प्रतिनिधी
खेड तालुक्याने कोरोना मुक्ती कडे वाटचाल सुरू केली असताना नवीन रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे  गेल्या ६ दिवसांत कोरोनाचे १० नवे रूग्ण आढळून आले आहेत.  त्यामुळे रुग्ण वाढीचा आकडा पुन्हा वाढणार की काय ? याकडेच आता लक्ष लागून राहिले आहे.
तालुक्यात नव्या रूग्णांमुळे कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ४१० वर पोहचली आहे. आतापर्यंत ६८ जणांचा कोरोनाने मृत्यू
झाला आहे. गेल्या २० दिवसांत कोरोनाचे १३ रूग्ण आढळले आहेत. नोव्हेंबर महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या घटली असली तरी आरोग्य प्रशासन मात्र सतर्कच आहे. आतापर्यंत १ हजार ३३३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तालुक्यात कोरोनाची तीव्रता कमी होत असली तरी नागरिकांनी शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करणे, बंधनकारक असल्याचे प्रशासनाकडून सातत्याने स्पष्ट करण्यात येत आहे.
जाहिरात4