७ डिसेंबरपासून कोकण रेल्वेवर त्रिवेंद्रम-वेरावल एक्स्प्रेस धावणार !

जाहिरात-2
खेड । प्रतिनिधी
कोकण मार्गावर एकामागोमाग एक साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचे सत्र सुरूच आहे. कोकण मार्गावर ७ डिसेंबरपासून त्रिवेंद्रम वेरावल साप्ताहिक विशेष गाडी धावणार आहे.
दर सोमवारी त्रिवेंद्रम रेल्वे स्थानकातून सायंकाळी ३.४० वाजता सुटून तिसऱ्या दिवशी सायंकाळी ३.४५ वाजता वेरावलला पोहोचेल. परतीच्या प्रवासात वेरावल येथून दर गुरुवारी पहाटे ६.४० वाजता वेरावल रेल्वे स्थानकातून सुटून तिसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता त्रिवेंद्रमला पोहोचेल. २२ डब्यांची ही साप्ताहिक गाडी वसई मार्गे धावणार आहे. पनवेल, खेड, रत्नागिरी, कुडाळ आदी ठिकाणी थांबे देण्यात येणार आहेत.
जाहिरात4