‘चैत्यभूमीवर’ खेड तालुका बौद्ध समाज संघटना मुंबई च्या वतीने अभिवादन ! 

जाहिरात-2
महामानवांना ६ महिन्यांनी मानवंदना
खेड । प्रतिनिधी
कोरोना आपत्ती काळामध्ये बंद ठेवण्यात आलेले  दादर चैत्यभूमी येथील घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक  ६ महिन्यांनी अभिवादनासाठी खुले करण्यात आल्याने खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ मुंबई च्या पदाधिकाऱ्यांनी जाऊन अभिवादन केले.
 कोविड परिस्थिती मूळे गेले ६ महिने चैत्यभूमी वरील अभिवादन बंद करण्यात आले होते.  अखेर शासकीय नियमानुसार चैत्यभूमी सर्वांसाठी खुली करण्यात आल्याने खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघाचे माजी अध्यक्ष संजय कापसे , माजी उपाध्यक्ष देवदत्त तांबे  , माजी चिटणीस ऍड संतोष सावंत , आणि  निखिल संतोष सावंत  यांनी अभिवादन केले.  चैत्यभूमी चे व्यवस्थापक  भन्ते बी संघपालजी थेरो यांचे  आशिर्वाद घेतले.
जाहिरात4