पानवल येथे दुचाकी चालकाला धडक देणाऱ्या ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल

जाहिरात-2

रत्नागिरी । प्रतिनिधी
तालुक्यातील पानवल येथे पुढील ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरुन येणार्‍या दुचाकीस धडक देत अपघात केला. या अपघातात दुचाकी चालकाच्या डोक्याला गंभिर दुखापत झाली असून ट्रक चालकावर ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला होता.

ट्रकचालक सुबोध शंकर सुर्वे (53,रा. पाली बाजारपेठ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. तर या अपघातात लक्ष्मण तानाजी सोनवडकर (रा.करबुडे,रत्नागिरी) हा गंभीर जखमी झाला होता.

जाहिरात4