लांजा :बाजारात गेलेल्या वृद्धाचा मृतदेह डोहात सापडला

जाहिरात-2

रत्नागिरी । प्रतिनिधी
भांबेड बाजारात जातो असे सांगून बेपत्ता झालेल्या वृद्धाचा मृतदेह शुक्रवारी सकाळी 8 वा.पाटकोंड येथील डोहात सापडून आला. याबाबत लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

यशवंत जयराम खेडगे (63, रा.प्रभानवल्ली, लांजा ) असे डोहात बुडून मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे.याबाबत बाळकृष्ण यशवंत खेडगे यांनी लांजा पोलिसांना खबर दिली. त्यानुसार, गुरुवारी दुपारी भांबेड बाजारात जातो असे सांगून यशवंत खेडगे घरातून बाहेर पडले होते. परंतु सायंकाळी उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने नातेवाईकांनी आणि गावातल्यानी त्यांचा शोध घेतला असता शुक्रवारी सकाळी 8 वा.पाटकोंड येथील डोहात त्यांचा मृतदेह सापडून आला.अधिक तपास लांजा पोलीस करत आहेत.

जाहिरात4