विजेची थकबाकी आज कळली,वर्षभर सरकार झोपले होते काय ?

जाहिरात-2

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा संतप्त सवाल

भाजपा सरकार विरोधात अजून आंदोलन तीव्र करणार

आमचे आंदोलन पोलिसांच्या विरोधात नाही

संतोष राऊळ | कणकवली
लोकांना शिवसेनेला निवडून दिल्याची चूक कळलेली आहे.भाजपा सरकारच्या काळातील वीज थकबाकी कळायला वर्ष लागले काय ? हे सरकार वर्षभर झोपले होते काय ? तीन पक्षाच्या सरकार मध्ये जो सावळा गोंधळ सुरू आहे तो कशासाठी ? आघाडी सरकारच्या मंत्र्यांमध्ये एक वाक्यता नाही. निवडणूक आचारसंहितेचा बाहू करून वीज माफी देण्यास धूळफेक चालू आहे.आजून आंदोलन तीव्र करणार.पोलिसांचा आणि आमचा वाद नाही मात्र सरकार विरुद्ध हा जनतेचा रोष आहे.सर्वच पक्षाचे लोक वाढलेल्या बिलांमुळे त्रस्त आहेत.बिलांचा घोळ ,एमइसीबी करत असलेल्या जबरदस्ती विरोधात हे आंदोलन आहे. हे आंदोलन पोलिसांच्या विरोधात नाही असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले आहे.ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
निसर्ग वादळाचे फक्त 35 लाख जमा झाले.14 कोतो 93 लाख होती. गतवर्षीच्या भात नुकसणालीत 10 कोटी 55 लाख मागणी होती.फक्त 5 कोटी 50 लाख मिळाले असे असतांना सत्ताधारी सांगतात की शेतकऱ्यांना न्यायदेणार तो कसा.मच्छीमार बांधवांना सुद्धा त्रास पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे.काँगेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सेनेत पक्ष प्रवेश करण्यासाठी जेव्हा फिरतात तेव्हा कोरोनाचा संसर्ग होत नाही काय ?त्यांना पोलोस नोटिसा देत नाहीत काय ?
सर्व सामान्य नागरिक जातात आणि अस्वच्छ प्रसूती गृह असेल तर काय करावे.प्रशासनावर अंकुश नाही.होडी धारक,उद्योजक याना वेठीस पालकमंत्री धरत आहेत.बैठक घेऊन तोडगा काढल्याचे भासवत आहेत.
भाजपा 14 मंडळात कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.संघटना मजबूत करण्या साठी काम सुरू आहे.१५०० कार्यकर्ते कोणत्याही विषयावर चर्चा सत्रात भाग घेतील असे शिक्षण दिले जात आहे.
शाळा सुरूझाल्या नाही तर पुढे होणाऱ्या परिणामाचा जबाबदार कोण ? ग्रामीण भागात पटसंख्या कमी आहे.एसटी, ट्रेन सर्व सुरू झाले.त्यामुळे शाळा सुरू केल्याच पाहिजेत. मात्र काळजी घेतली पाहिजे, मुलांच्या आरोग्यची काळजी घेऊन शाळा सुरू करा.असेही भजापा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सांगितले

जाहिरात4