रस्त्यावर वाळत टाकलेल्या कोकम बीयांवर दुचाकी घसरून शिक्षीका जखमी

जाहिरात-2

मळगाव सावळवाडा येथील प्रकार ; उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल

सावंतवाडी | प्रतिनिधी

घरासमोर मुख्य रस्त्यावर वाळत टाकलेल्या कोकम बीयांवर दुचाकी घसरून पडल्याने झालेल्या अपघातात नेमळे शाळेच्या शिक्षिका पूजा पवार (रा. सावंतवाडी ) या गंभीर जखमी झाल्या. मळगाव नेमळे रस्त्यावर सावळवाडा येथे हा अपघात घडला. यात त्यांच्या चेहऱ्याला दुखापत झाली आहे. अपघातानंतर १०८ रुग्णवाहिकेच्या सहाय्याने त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. यासाठी शिवसेनेचे मळगाव उपविभाग प्रमुख महेश शिरोडकर यांनी सहकार्य केले. रस्त्यावर अशाप्रकारे भात, बिया वन्य वस्तू वाळत टाकणे चुकीचे असून वाहनधारकांना धोकादायक ठरत असल्याचे यावेळी महेश शिरोडकर यांनी बोलताना सांगितले. ग्रामस्थांनी असे प्रकार टाळायला हवेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

जाहिरात4