मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्यासाठी एक छदामही नाही

जाहिरात-2

ठाकरे सरकारकडून सिंधुदुर्गच्या जनतेची पुन्हा उपेक्षा
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सहाय्यता निधीतुन मिळाले ४७ व्हेंटिलेटर
मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळाला नसल्याने दातेही झाले हतबल
दिल्लीतून मदत पोचली मात्र राज्यसरकार कडून जनतेचा भ्रमनिरास

संतोष राऊळ(कणकवली)
कोरोना काळात आरोग्य सुविधांसाठी सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवी संस्था, राजकीय पदाधिकारी, विविध बँका,पतसंस्था,नोकरवर्ग आणि जनता यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमाकेले गेलेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या खात्यात जनतेने आर्थिक मदत पाठवावी ती आपण प्रत्येक जिल्ह्यातील आरोग्य सुविधांसाठी खर्च करू असे जाहीर केले होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही कोट्यवधी रुपयांची मदत पाठवली होती मात्र एका दमडीचीही परत फेड सिंधुदुर्ग ला झालेली नाही.किंवा रुग्णालयात उपयोगी ठरेल असे एकादे मशीन सुद्धा या निधीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले नाही.जिल्ह्यात व्हेंटीलेटर नसल्याने कोरोना रुग्णांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीतून सिंधुदुर्ग जिल्ह्याला ४७ व्हेंटीलेटर पाठवून दिले मात्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक छदामही मिळालेला नाही. ही सिंधुदुर्ग जिल्ह्याची वास्तववादी शोकांतिका आहे.
पंतप्रधान सहाय्यता निधी म्हणजे पीएम रिलिफ फंड व मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणजेच सीएम रिलिफ फंड, हा फंड कोविड १९ च्या आपत्ती काळात राज्यात वितरित करण्यात आला. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निधी जिल्ह्यातील स्थानिक रुग्णालयात पोचला. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय ओरोस येथे २८ व्हेंटिलेटर देण्यात आले.कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १० तर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात ९ व्हेंटिलेटर देण्यात आले.एकूण ४७ व्हेंटिलेटर सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोदी सरकारने दिले मात्र महाराष्ट्र राज्याच्या ठाकरे सरकारने एकही रुपया मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन सिंधुदुर्ग जिल्हयाच्या आरोग्य यंत्रणेला दिलेला नाही.माहितीच्या अधिकारात ही माहिती आरोग्यखात्यानेच दिली असल्याने मुख्यमंत्री साहाय्यता निधीचा कोरोना काळात राजकीय भांडवल करणाऱ्या शिवसेनेला चांगलीच चपराक बसली आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पैसे पाठविल्यानंतर फोटोशेषण करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय पुढाऱ्यांना या निधीचा उपयोग जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी झालेला नाही.तो निधी अन्य जिल्हात मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला आणि आपल्या जिल्हयात त्यातील रुपयाही दिला नाही याचा पश्चाताप होत असेल.यात प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या नियोजन बद्ध कारभाराची अनुभूती येते दिल्लीत मंत्रालयातून प्रत्येक रुग्णालयात कोणत्या गोष्टींची कमतरता आहे हे जाणून त्या स्वरूपाची मदत कोरोना काळात केली जाते हे मोदिसरकरचे काम म्हणजे साथीच्या काळात देश कसा चालवावा याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.आजही गावोगावी २५किलो धान्य मोदी सरकारच देत आहे.वर्षाला ६ हजार रुपये शेतकरी अनुदान, जनधन योजनेत प्रतिमहिना ५००रुपये मोदी सरकारच जमा करत आहे.या सर्व कामाच्या तुलनेत राज्यातील ठाकरे सरकार कोसो दूर आहे.मोदी सरकार एवढे काम करणे अशक्यच मात्र काही प्रमाणात प्रयत्न होणे गरजेचे आहे ते सुद्धा होत नाहीत म्हणून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही आणि कोरोना काळात विजेचे दर भरमसाठ ढवून जनतेला महागाईच्या खाईत या ठाकरे सरकारने लोटले आहे.

जाहिरात4